|| श्री अन्नपूर्णा प्रसन्न ॥

॥ अन्नपूर्ण सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे ॥

॥ ज्ञान वैराग्य सिध्यर्थ भिक्षां देहिच शांभवी ॥

शांभवी म्हणजे काय ? श्री शंभोला म्हणजे ” शंकराला ” प्रिय असणारी म्हणजे “ शांभवी ” , शांभवी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे आणि “ अन्नपुर्णादेवी ” हे माता पार्वतीचे एक रुप आहे . म्हणून शांभवी म्हणजे अन्नपूर्णा देवीच असे म्हटले तर वावगे ठरु नये .

आमच्याबद्दल

आजकाल पती – पत्नी दोघेही नोकरी / व्यवसाय करतात . ” वर्किंग कपल ‘ ही काळाची गरज झाली आहे . यामुळे गृहीणीला स्वयंपाक घरात जास्त वेळ देणे कठीण ठरत . तसेच घरे लहान असल्यामुळे पापड , कुरडया , शेवया व इतर वाळवण प्रकार करणे जमत नाही , पण हे सर्वच पारंपारीक खाद्य प्रकार प्रत्येकाला खावेसे वाटतात . ही गरज लक्षात घेऊन देवयानी कानडे यांनी २००४ ” शांभवी ” गृहउद्योगची मुहूर्तमेढ रोवली . आणि अस्सल घरगुती चवीच्या विविध महाराष्ट्रीयन खाराप्रकारांची निर्मिती आणि विक्री सुरु केली . शांभवी गृहउद्योग ही महाराष्ट्र खाद्यनियमन कायदवाखाली पंजीकृत असलेला उपक्रम आहे .

शांभवी एक खाद्य यात्रा .

शांभवीचे उद्दीष्ट- आजच्या फास्टफुड व जंक फूडच्या काळात , दर्जेदार , सकस व घरगुती चवीचे पारंपारीक महाराष्ट्रीयन व इतर खाद्यप्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हे ‘ शांभवीचे मुख्य उद्दिष्ट आहे . अन्न , वस्त्र , निवारा या आपल्या मुलभूत गरजा आहेत . ‘ अन्न ( खाद्य ) क्षेत्रात घरगुती चवी’च्या खाद्यपदार्थाना आणि व्यंजनांना दिवसेंदिवस वाढत असलेला पाठींबा व मागणी लक्षात घेऊन सौ देवयानी कानडे यांनी शांभवीची

मुहुर्तमेढ २००४ साली रोवली . शांभवी आज मुख्यत्वे करुन महाराष्ट्रीयन स्वयंपाक घरात नियमित लागणारे विविध पिठे , विविध पुडी , विविध पावडरी , विविध पापड व वाळवण प्रकार , विविध मसाले , कोरडया चटण्या , विविध लोणची , लाडु , चिवडा , शंकरपाळे , चकली , यासारखे विविध फराळाचे पदार्थ , ऊपवासाचे विविध व्यंजने , रोस्टेड नमकीन , सारखे विविध खाद्य प्रकार नियमित स्वरुपात बनवुन त्याची विक्री करते . एकप्रकारे शांभवी म्हणजे आपली ” स्वयंपाक घरातील साथी‘ च म्हणानं .

प्रथम स्वतःच्या राहत्या घरातून , मग भाडे तत्वावर असलेल्या जागेतून आणि आत बजाजनगर , नागपूर येथील स्वतःच्या जागेतून शांभवीचे कामकाज चालते . हसतमुख सेवा , नेहमी ११ तास ग्राहकांसाठी उघडे असलेले ठिकाण , दर्जेदार उत्पादने , उत्तम चवीची खात्री , उत्पादनची योग्य किंमत , हवा तो खाद्य प्रकार आणि खाद्य साहित्य कधीही मिळु शकण्याची खात्री या लौकीकामुळे ” शांभवी गृहउद्योगाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे . शांभवीचा ग्राहक वर्ग नागपूरात बऱ्याच भागात पसरलेला असून , नागपूरातच नव्हे तर विदर्भात , अमरावती , अकोला , खामगाव , चंद्रपूर , यवतमाळ येथे सुध्दा शांभवीचा माल जातो . तसेच महाराष्ट्रात पुणे , मुंबई , नांदेड , औरंगाबाद , नाशिक येथे पण शांभवीचे चोखंदळ ग्राहक आहेत . याचबरोबर , भारतात इंदोर , जबलपूर , भोपाल , बँगलुरु , चंदीगड , मैसूर , हैद्राबाद , दिल्ली , गुडगाव , मंडी , येथे पण शांभवीचे काही ग्राहक आहेत जे कुरिअरने शांभवीचे प्रॉडक्टस् नियमीत स्वरुपात मागवतात . दर दिवाळीला शांभवीचे फराळाचे पदार्थ परदेशी सुध्दा जातात ज्यात लंडन , कॅलीफोर्निया , कॅनडा , न्यूयार्क , दुबई , मस्कत , ऑस्ट्रेलिया , बँकॉक येथील महाराष्ट्रीयन ग्राहकांना त्याच्या ऑर्डर नुसार पाठवले जातात . ” शांभवीला ” मिटकॉन या उद्योजकतेशी निगडीत असलेल्या संस्थेचे मार्गदर्शन लाभले आहे .